शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने पारपेठ भागातील मदार टेकडी,मुश्ताक अली नगरातील तुटलेले ढापे नविन बनविण्याचे काम तात्काळ सुरू

Viral news live
By -
0
शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने पारपेठ भागातील मदार टेकडी,मुश्ताक अली नगरातील तुटलेले ढापे नविन बनविण्याचे काम तात्काळ सुरू
शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने पारपेठ भागातील मदार टेकडी,मुश्ताक अली नगरातील तुटलेले ढापे नविन बनविण्याचे काम तात्काळ सुरू 

शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी केली होती न.प प्रशासक तथा तहसीलदार,मुख्याधि   ऱ्यांकडे  मागणी 

मलकापुर:-  शहरातील पारपेठ भागातील मदार टेकडी ईदगाह रोड, मुश्ताकअली नगरातील रस्त्यावरील ढापे तुटले असल्याने रस्त्यावरून दुचाकी, ऑटो, चार चाकी वाहनांना ये- जा करण्यासाठी मोठ्या तारेवरची कसरत  करावी लागत असल्याने.या ढाप्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी  मागणी निवेदनाद्वारे न.प प्रशासक तथा तहसीलदार राहुल तायडे,न.प मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती,ढाप्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास लोकशाही मार्गाने न.प समोर  आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला होता.शिवसेनेच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्याच्या धास्तीने नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेत आज दि.02 सप्टेंबर 25 रोजी न.प बांधकाम अभियंता धिरज ठोंबरे यांनी कामगारांना सोबत घेत मदारटेकडी ईदगाह रोड, मुश्ताक अली नगरातील तुटलेले ढापे तोडून नविन ढापे बनविण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले.या वेळी सुरू असलेल्या ढाप्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करतांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास,किसान सेना शहरप्रमुख सै.वसिम सै. रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी,विभाग प्रमुख सत्तार शाह,मुस्ताक पठाण, जावेद खान, युसुफ खान,वसीम जमादार, शेख अवैस, शेख आसीफ, शेख शाकीर अब्दुल तनवीर, जलील खान, सोहिल खान,शेख शोयेब, युनुस खान, शेख.अतीक, शेख रिजवान, शेख अलीम, शेख राजा शेख शाकीर, अब्दुल सुफयान सह आदि रहिवासी नागरिकांची उपस्थिती होती.
Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !