(अतिक खान) बोरीवली मुंबई
बोरिवली (मुंबई) - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
31/08/2025
*भारतीय क्रीडा प्राधिकरण* च्या मुंबईतील प्रादेशिक केंद्राने *संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (एसजीएनपी)* सहकार्याने *मुंबईतील बोरिवली* येथे *‘संडेज ऑन सायकल’* च्या 38 व्या आवृत्तीचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमात 500 हून अधिक उत्साही सायकलपटू सहभागी झाले, तसेच तंदुरुस्ती, शाश्वतता आणि सामुदायिक भावना यांचा उत्सव साजरा केला.
या कार्यक्रमाला *केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर *प्रसिद्ध अभिनेते आणि फिटनेस आयकॉन श्री. जॅकी श्रॉफ* हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
*माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी* यांच्या *“फिट इंडिया मिशन”* अंतर्गत सुरू करण्यात आलेले *“संडेज ऑन सायकल”* हे अभियान संपूर्ण भारतात दर आठवड्याला अधिकाधिक विस्तारत आहे, यावर *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी आपल्या भाषणात भर दिला. सायकलिंग हा केवळ तंदुरुस्तीचा मार्ग नाही तर विशेषतः शहरी भागांमधील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर एक व्यावहारिक उपाय आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. सायकल चालवणे हा निरोगी राहण्याचा एक सोपा पण शक्तिशाली मार्ग असल्याचे सांगून, नागरिकांनी सायकल चालवणे हा जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारण्यास त्यांनी प्रेरित केले.
*अभिनेते जॅकी श्रॉफ* यांनी आपल्या नेहमीच्या प्रेरणादायी शैलीत उपस्थितांना स्मरण करून दिले की "फिटनेस प्रत्येकासाठी आहे." *"पैरो में दम तो आगे कदम"* असे सांगत सहभागींना मजबूत राहण्याचे, आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचे आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना तंदुरुस्त आणि सक्रिय जीवन जगण्यास प्रेरित करण्याचे आवाहन *अभिनेते जॅकी श्रॉफ* यांनी केले.
हा कार्यक्रम *भारतीय क्रीडा प्राधिकरण* मुंबईतील प्रादेशिक केंद्राने *राष्ट्रीय क्रीडा दिन* च्या तीन दिवसीय उत्सवाचा एक भाग म्हणून *प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (IRS)* यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.