जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित "सेवा पंधरवाडा 2025" नियोजन बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...

Viral news live
By -
0
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित "सेवा पंधरवाडा 2025" नियोजन बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित "सेवा पंधरवाडा 2025" नियोजन बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...

(अतिक.खान मुक्ताईनगर)

अधिक माहिती अशी की
*जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव* येथे *"सेवा पंधरवाडा 2025"* बाबत नियोजन सभागृहात *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* व *वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे* यांच्या प्रमुख उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री.चंद्रकांतजी सोनवणे, आमदार श्री.मंगेशजी चव्हाण, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, मनपा आयुक्त श्री.ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री.नखाते साहेब यांची उपस्थिती होती.

*या चर्चेत पुढील मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली:* पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे, नवकल्पनात्मक उपक्रम, प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थ्यांना थेट लाभ, घरांचे वितरण, स्थानिक गरजा व समस्या सोडवणे, तसेच विविध शासकीय विभागांची भूमिका. नागरिकांना चांगल्या सुविधा व शासनाच्या विविध अभियानांचा लाभ मिळावा यावर उपस्थित सर्वांनी सकारात्मक मत व्यक्त केले.

दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी *मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी* यांचा जन्मदिन ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ *महात्मा गांधी जयंती* या कालावधीत *महसूल विभाग* मार्फत *छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान* अंतर्गत *“सेवा पंधरवाडा”* साजरा करण्यात येणार आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याआधी राबविलेले उपक्रम आता मोहीम स्वरूपात युद्धपातळीवर राबविण्यात येणार असून पंधरवाड्यानंतरही ते सातत्याने सुरू राहतील.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*