अवघ्या २ तासात खुन प्रकरणातील आरोपीला अटक
VIRAL NEWS LIVE | पुणे | ०३ ऑगस्ट २०२५
काळेपडळ पोलिसांची तत्पर कारवाई; खोटा कॉल करून गुन्हा लपविण्याचा प्रयत्न फसला
पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची गंभीर घटना उघडकीस आली असून केवळ दोन तासांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटना दिनांक २ ऑगस्ट रोजी पहाटे ४.५२ वाजता घडली.
बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातील अजगारवा येथील किसन राजमंगल सहा (वय २०) याने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत माहिती दिली की, चार अनोळखी इसमांनी त्याच्या मित्रावर हल्ला केला आहे. त्याने सांगितले की रविकुमार शिवशंकर यादव याला बेडसिट व गादी न दिल्याच्या कारणावरून चार अनोळखी इसमांनी लोखंडी पहाराने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.
खोट्या कॉलचा उलगडा
काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच रविकुमार यादव याला रक्ताच्या थारोळ्यात सापडले. १०८ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तपासादरम्यान कॉल करणाऱ्या इसमाच्या (किसन सहा) माहितीमध्ये तफावत आढळून आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार इसम दिसले नाहीत आणि परिसरातील नागरिकांच्या चौकशीतून समजले की, मृत आणि आरोपीमध्ये किरकोळ वाद होत होते.
पोलीस खाक्या दाखवताच किसन सहा याने खुनाची कबुली दिली. त्याने सांगितले की, दारूच्या नशेत मृताने वारंवार शिवीगाळ करून मारहाण केल्यामुळे रागाच्या भरात त्याच्या डोक्यात लोखंडी पहाराने वार करून त्याचा खून केला.
खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी किसन सहा याच्यावर गुन्हा रजि. क्र. ३०२/२०२५ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रत्नदीप गायकवाड हे करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ०५ श्री. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासात सपोनि विलास सुतार, सपोनि रत्नदीप गायकवाड, सहा. पोनि अमित शेटे, पोउनि अनिल निंबाळकर, पो. अं. प्रविण काळभोर, प्रतीक लाहीगुडे, दाऊद सय्यद, किशोर पोटे, प्रविण कांबळे, परशुराम पिसे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, सद्दाम तांबोळी, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदीप बेडीस्कर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे या विशेष पथकाने केली आहे.
✍️ बातमी: Viral News Live
#PuneCrime #KalePadalPolice #MurderCase #ViralNewsLive #PuneUpdates