अतिक खान धाराशिव औरंगाबाद | Viral news live
धाराशिव महाराष्ट्रातील हजारो हिमोफिलिया रुग्ण सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत रक्तस्त्रावाशी संबंधित या दुर्मीळ आणि अनुवांशिक आजारावर जीवनावश्यक ठरणारी Factor 8 7 आणि 9 ही औषधे जिल्हा रुग्णालयांमध्ये अपुरी असल्याने रुग्णांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे
औषधांचा वेळेवर पुरवठा न झाल्याने अनेक रुग्णांना कायमस्वरूपी अपंगत्व येत आहे तसेच काही ठिकाणी मृत्यूचीही नोंद झाली आहे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना दीड ते दोनशे किलोमीटर अंतर पार करून जिल्हा रुग्णालयात यावे लागत आहे अशा वेळी वेळेवर औषध उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ येत आहे
हिमोफिलिया क्षेत्रातील संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ शुभम धूत यांनी राज्य शासनाकडे ठाम मागणी केली आहे की सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये Factor 7 8 आणि 9 औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत तसेच तालुका स्तरावरील सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये ही औषधे कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्यात यावीत
डॉ धूत यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात ही औषधे सहज उपलब्ध झाली पाहिजेत हा केवळ उपचारांचा नव्हे तर हजारो कुटुंबांच्या अस्तित्वाचा आणि जीवनमरणाचा प्रश्न आहे
हिमोफिलिया रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरवठा वेळेवर झाल्यास मृत्यूदर आणि अपंगत्वाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते त्यामुळे शासनाने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे

