महेश अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या.मलकापूर ची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

Viral news live
By -
0
महेश अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या.मलकापूर ची वार्षिक सभा उत्साहात संपन्न


मलकापूर प्रतिनिधी :- महेश अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या. मलकापूर या संस्थेची वार्षीक साधारण सभा रविवार दि.२५.०८.२०२५ रोजी  समर्पण लॉन, बुलडाणा रोड, मलकापूर येथे संपन्न झाली. सभेचे अध्यक्ष मख्खनलाल मुंधडा व संचालकांनी भगवान महेश आणि  माता लक्ष्मी चे पुजन करुन सभेला सुरुवात केली. सर्वप्रथम दिवंगत सभासद राष्ट्रीयनेते, सामाजिक विभुती, व नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले कर्तव्यदक्ष जवान पोलीस अधिकारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
        संस्थेचे उपाध्यक्ष किशोरजी बाहेती यांनी २०२४-२०२५या वर्षाच्या आर्थिक पत्रकांचे विस्तृत वाचन केले ज्याला सभेने टाळ्यांच्या गजरात मंजूरी दिली. संस्थेच्या ३६ वर्षातील आर्थिक प्रगतीचे आलेख व सामाजीक उपक्रमाची माहीती सभेत देण्यात आली, संस्थेकडे आतापर्यत ठेवी ४६.२१कोटी, कर्जवाटप ३४.२२ कोटी, गुंतवणूक १८.४८कोटी भागभांडवल
१.६७ कोटी संस्थेने आतापर्यंत ८.४१ कोटीचा निधी उभारला आहे. संस्थेने २०२४-२०२५या वर्षात ३३.७०लाख  रुपयांचा नफा मिळविला असून लाभांश १०% टक्के देण्याचे ठरविले आहे. संस्थेचे अध्यक्ष मख्खनलाल मुंधडा यांनी आपल्या केलेल्या भाषणात संस्थेव्दारा सुरु असलेले
सामाजिक उपक्रम भविष्यातील संभावित योजना तसेच दरवर्षीप्रमाणे सभासदांची रु. १०००००/- ची जनता विमा पॉलिसी सुध्दा पुर्ववत सुरु ठेवण्याचे ठरले. संस्थेव्दारे जलसेवा केंद्र, बेवारस प्रेताचा अंतिमसंस्कार, वैद्यकीय शिबिर, तसेच गौसेवा उपक्रमाला सहकार्य इ. सामाजिक उपक्रम नेहमी चालु असतात याबददल माहिती दिली. सभेमध्ये काकासाहेब दिक्षित प्रशिक्षण केंद अकोलाचे .के.पी. कांबे,  पी.यु.गोपनारायण यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले तसेच सभेमध्ये झालेल्या खुल्या चर्चेत सभासदांनी व पदाधिका-यांनी नवीन उपक्रम व काही मुदद्यावर आपले विचार प्रकट केले. सभेत उपाध्यक्ष नंदलाल राठी, संचालक पारसमल झाबक धिरजजी मुंघडा, संतोषजी पाटील, गजानन गोसावी, तज्ञसंचालक घनश्यामदास मुंधडा, नांदुरा सल्लागार समितीचे मोहनलाल राठी, अजय डागा उपस्थित होते. सभेच्या शेवटी व्यवस्थापक सुनिल अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन करतांना निबंधक कार्यालय, अंकेक्षण कार्यालय, सभासद, ठेवीदार, समर्पण लॉन उपलब्ध करुन दिल्याबददल गिरीराज राठी व इत्यादीनी केलेल्या सहकार्याबददल आभार मानले सभेला कर्मचारी वृंद परमानंद व्यास, अशोक डवले, सदाशिव मोगरे, संजय भोंबे, मनोज बढे, बाबुराव इंगळे, राहूल घुसे सिध्देश्वर खारोडे,, राजेंद्र मानकर, पवन टावरी, गणेश तांबोळकर, नरेश चांडक, दिपक अग्रवाल, महेश शर्मा पवन शर्मा, प्रमोद उंटवाल, रमेश गंगावणे, मनिश शर्मा प्रविण राठी इ. उपस्थित होते. शेवटी उपस्थितांनी जेवनाचा आस्वाद घेतला.
Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*