MSEB उर्फ महावितरण कार्यालयात ठेकेदाराचा वाढदिवस ! निषेधार्थ मुक्ताईनगर शिवसेनेचे प्रतीकात्मक आंदोलन

Viral news live
By -
0
MSEB उर्फ महावितरण कार्यालयात ठेकेदाराचा वाढदिवस ! निषेधार्थ मुक्ताईनगर शिवसेनेचे प्रतीकात्मक आंदोलन


(अतिक खान) मुक्ताईनगर | Viral news live
मुक्ताईनगर येथील महावितरण कार्यालयात दैनंदिन समस्या घेऊन आलेल्या शेतकरी व नागरिकांना ताटकळत ठेवत  कार्यकारी अभियंत्याच्या दालनात सदरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठेकेदाराचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला होता. ही बाब अतिशय निंदनीय व संतापजनक असून शासकीय अधिकारी असतील किंवा कार्यालय शासनाने लावून दिलेल्या नियमांची पायमल्ली आहे. असा आरोप करत जोपर्यंत संबंधित कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत दररोज महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा वाढदिवस शिवसनेतर्फे साजरा करण्याचे आंदोलन सत्र सुरू झाले असून आज दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी पहिल्याच दिवशी अभियंत्याच्या दालनात घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्याचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
शहरात झालेली महावितरण कडून झालेली ट्री कटिंग याचा कचरा कोण उचलणार असा सवाल नगरसेवक निलेश शिरसाट यांनी उपस्थित केले यावर उत्तर देताना कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी संबंधित ट्री कटिंग ठेकेदाराची ही जबाबदारी असल्याचे सांगत तशा सूचना सदरील ठेकेदाराला देतो असे सांगितले.
यावेळी शिवसेना शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील,जिल्हा संघटक सुनील पाटील, उपजिल्हा संघटक पंकज कोळी, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, युवासेना तालुका प्रमुख जितेंद्र मुऱ्हे, शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष मराठे, तालुका प्रसिद्धी प्रमुख निलेश मेढे , शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, पंकज पांडव ,शिवाजी पाटील, युवासेना शहरप्रमुख नाना बोदडे, नगरसेवक नीलेश शिरसाट, आरिफ आझाद, युनूस खान तसेच विक्रांत सावकारे , संतोष माळी, सचिन पालवे,  रोशन पाटील, ईश्वर मस्के , जावेद खान, माणिक इंगळे, विजय काळे, दीपक खुळे, प्रफुल्ल कोळी, दीपक वाघ आदींसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहा कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण तसेच शिवसेना तालुका प्रमुख काय म्हणाले ?

ठेकेदार स्वतः केक घेऊन आला व केक कापून निघून ही बाब खरच चुकीची आहे. जो प्रकार घडला त्याबद्दल माझी चूक झाली मी मान्य करतो.आंदोलनादरम्यान शिवसेनेसोबत जी चर्चा झाली आहे त्यावर तोडगा काढून शेतकऱ्यांची कामे चांगल्या प्रमाणात व वेळेवर केली जातील याची ग्वाही देतो अशी प्रतिक्रिया महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांनी दिली.
 कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण रुजू झाले आहे त्या दिवस पासून शेतकरी किंवा वीज ग्राहक यांच्या हिताचा निर्णय घेतला जात नाही.मात्र ठराविक लोक किंवा ठेकेदार यांचं काम कस केले जाईल त्या पद्धतीने या कार्यालयाचे कामकाज सुरू आहे.शेतकरी व ग्राहक यांच्या समस्यांकडे लक्ष न देता स्वहिताचे व आर्थिक हिताचे काम करण्यावर भर या कार्यालयातून व कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांच्या माध्यमातून होत आहे.तसेच गेल्या चार दिवसांपूर्वी एका खासगी ठेकेदाराचा वाढदिवस साजरा करण्यात आला ही बाब संतापजन आहे याचा निषेध म्हणून आज हे आंदोलन करण्यात आले. तसेच जोपर्यंत त्यांचं निलंबन होणार नाही कारवाई होणार नाही तोपर्यंत गांधीगिरी आंदोलनच स्वरूपात प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांचा वाढदिवस या कार्यालयात करण्यात येईल.अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील यांनी दिली.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*