![]() |
स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचे खेळाडूसॉफ्ट-टेनिस क्रीडा स्पर्धेत विभागस्तरावर |
मलकापूर प्रतिनिधी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा आणि जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक २५ ऑगस्ट रोजी सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ बुलढाणा यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.स्पर्धेत तब्बल जिल्ह्यातील १५ शाळेमधून एकूण ७२ खेळाडूंनी सहभाग घेतला.यात स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेची इयत्ता ६ वी मध्ये शिकत असलेली खेळाडू कु.आरोही दरेगावे हिने उत्कृष्ट कामगिरी करून १४ वर्षे आतील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकविला.तर मुलांच्या १४ वर्षातील गटामध्ये आरव दरेगाव याने उत्कृष्ट खेळ खेळून पाचवा क्रमांक मिळविला.तसेच १७ वर्ष आतील मुलींच्या वयोगटात राष्ट्रीय खेळाडू कु.पलक शैलेंद्रसिंह परदेशी हिने उत्कृष्ट कामगिरी करून तृतीय क्रमांक मिळविला.स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या या तिन्ही खेळाडूंनी विभागस्तरीय शालेय सॉफ्टटेनिस क्रीडा स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले.या शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर,क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार,सॉफ्ट टेनिस संघटनेचे सचिव विजय पळसकर, राजेश्वरजी खंगार,यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.
या यशस्वी खेळाडूंना स्कूल ऑफ स्कॉलर्सचे क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल साळुंके,क्रीडा शिक्षक मनीष उमाळे,विनायक सुरडकर, क्रीडा शिक्षिका मानसी पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले.विजयी खेळाडूंच्या कामगिरीबद्दल शाळेचे संचालक ॲड.श्री.अमरकुमारजी संचेती, मुख्याध्यापिका डॉ.सुदीप्ता सरकार व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी,विद्यार्थी यांनी कौतुक व अभिनंदन केले.