बुलढाणा : भरधाव एसटी बसच्या धडकेत ११ मेंढ्या ठार झाले असून सहा मेंढ्या जखमी झाले आहे ही घटना २७ ऑगस्ट रोजी खडकी फाट्या नजीक वळणावर घडली या घटनेत संबंधित मेंढपाळाचे १ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याप्रकरणी फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोताळा तालुक्यातील वारुळी येथील शांताराम संजू बिचकुले यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे लहान मोठ्या शंभर मेंढ्या आहे मेंढ्या चारण्यासाठी फिर्यादी हे कुटुंबासह मागील दोन महिन्यापासून खडकी फाट्याजवळ पाल ठोकून राहत असून आसपासच्या शेतशिवारात मेंढ्या चारत आहे २७ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे फिर्यादी आणि त्याचा लहान भाऊ मेंढ्या चारण्यासाठी खडकी फाट्या नजीक वळणावरून जात असताना बुलढाण्या कडून मोताळा मार्गे मलकापूर जाणाऱ्या छत्रपती संभाजी नगर ते मलकापूर एम एच २० बी एन ४०३६ क्रमांकाच्या बस चालकाने त्याच्या ताब्यातील एसटी बस भरधाव तथा निष्काळजीपणे चालून मेंढ्याच्या कडपातील अकरा मेंढ्या चिरडून ठार केल्या असून सहा मेंढ्या जखमी केल्या या घटनेत अंदाजी एक लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले तसेच बस चालकानी घटनास्थळी बस न थांबता बस घेऊन पोबारा केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी एसटी बस ताब्यात घेत चालक सुभाष धुमा राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ बळीराम खंडागळे,पोकॉ शे.इसाक हे करीत आहे.