चिखली पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही वयोवृद्धांना फसवणारा सराईत लुटारू जेरबंद ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाची कारवाई

Viral news live
By -
0
चिखली पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही वयोवृद्धांना फसवणारा सराईत लुटारू जेरबंद    ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाची कारवाई


 प्रतिनिधी चिखली 

चिखली शहरात वयोवृद्ध इसमाला फसवून  सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चिखली पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या डीबी  पथकाने अवघ्या चौवीस तासांत जळगाव खान्देश येथून अटक केली. आरोपीकडून चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फिर्यादी दगडू विठोबा सोळंकी (वय ८३, रा. चांधई, ता. चिखली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास चिखली येथील आठवडी बाजारात ते भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. त्या वेळी पारधी बाबा मंदिराजवळील अंबिका जनरल स्टोअर्ससमोर एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी नातलग असल्याचे सांगत ओळख निर्माण केली. त्यानंतर फिर्यादींच्या उजव्या हातातील सोन्याची अंगठी पाहण्याच्या बहाण्याने आरोपीने अंगठी घेतली व थैली घेऊन येतो असे सांगून पसार झाला. या अंगठीचे वजन सुमारे ५ ग्रॅम असून अंदाजे ₹३०,००० इतकी आहे. फिर्यादींच्या तक्रारीवरून चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपास सुरू केला. पोना अमोल गवई यांनी खामगाव पोलिसांशी संपर्क साधल्यावर आरोपी जळगाव-खान्देश येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोउपनि समाधान वडणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोना अमोल गवई, पोकों प्रशांत धंदर, निलेश सावळे सहकार्यासह २६ ऑगस्ट रोजी जळगाव येथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेली अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास पोहेक विजय गिते व मदतनीस सुधाकर पाडळे करीत आहेत.  कारवाई मा. पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*