अल्पवयीनसह मोबाईल चोरटा ताब्यात न्यायालयाने दिली एक दिवसाची कोठडी

Viral news live
By -
0
अल्पवयीनसह मोबाईल चोरटा ताब्यात न्यायालयाने दिली एक दिवसाची कोठडी
अल्पवयीनसह मोबाईल चोरटा ताब्यात न्यायालयाने दिली एक दिवसाची कोठडी


प्रतिनिधी देऊळगाव राजा 
मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या दोघा चोरट्यांना अंढेरा पोलिसांनी अटक केली.. दरम्यान आरोपीच्या चौकशीनंतर देऊळगाव राजा पोलीस ठाणे अंतर्गत मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांनी अंडेरा पोलिसाकडून दोघे आरोपी ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

अमोल उर्फ राहुल उर्फ वांग्या गजानन वाघ वय २४ रा. चिखली व एक विधी संघर्ष अल्पवयीन अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून  पोलिसानी सहा मोबाईल एक स्कुटी क्रमांक एम एच २८- बी झेड ०१७१ जपत केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशी अंती चोरट्‌यांनी दोन मोबाईल अंढेरा फाट्‌याजवळ असलेल्या पेट्रोल पंपावरून एक मोबाईल , चिखली येथून तर तीन मोबाईल देऊळगाव राजा आठवडी बाजारातून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. यावरून सबंधित दोघा आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल शरद साळवे तपास करीत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून अजून मोबाईल चोरीचे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*