मुक्ताईनगर शहरात जातीय सलोखा कायम ठेवून मुस्लिम समाज ईद-ए-मिलाद 8 सप्टेंबर रोजी साजरी करणार.... प्रशासन कडून ईद मिलादुन्नबी समितीचे अभिनंदन...

Viral news live
By -
0
मुक्ताईनगर शहरात जातीय सलोखा कायम ठेवून मुस्लिम समाज ईद-ए-मिलाद 8 सप्टेंबर रोजी साजरी करणार.... प्रशासन कडून ईद मिलादुन्नबी समितीचे अभिनंदन...
मुक्ताईनगर शहरात जातीय सलोखा कायम ठेवून मुस्लिम समाज ईद-ए-मिलाद 8 सप्टेंबर रोजी साजरी करणार....
प्रशासन कडून ईद मिलादुन्नबी समितीचे अभिनंदन...

मुक्ताईनगर(अतिक खान)मुक्ताईनगर येथील दिनांक 28 रोजी पोलीस विभागाकडून मुक्ताईनगर येथील शांतता कमिटीच्या आयोजन करण्यात आले होते सदर शांतता कमिटीचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल बडगुजर हे होते या वेळी मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक श्री.आशिष अडसूळ साहेब, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुभाष जानोरे साहेब, आकाश तायडे,महावितरण विभागाचे कुणाल ठाकरे हे प्रमुख उपस्थित होते. सविस्तर वृत असे की,मुस्लिम समाजाच्या पवित्र महत्त्वाचा सण ईद-ए-मिलादुन्नबी यंदा 5 सप्टेंबरला आहे परंतु दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबरला गणेश विसर्जन उत्सव असल्याने मिरवणुका एकाच वेळी निघल्यास कायदा सुव्यवस्था व पोलिस प्रशासनावर सलग दोन दिवस ताण होईल त्यामुळे मुक्ताईनगर येथील ईद- ए-मिलाद ची मिरवणुक मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाज तर्फे ईद-ए-मिलाद ची 8 सप्टेंबरला साजरी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार मुक्ताईनगर शहरातील ईद-ए-मिलाद समिती तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे व या संदर्भात पोलिस प्रशासनाला निवेदन सदर करण्यात आले या वेळी सुन्नी मनियार मस्जिद ट्रस्ट चे कलीम मनियार, मिलत ग्रुप चे शोएब खान,मनियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी,अफसर खान,अहमद ठेकेदार,मुशीर मनियार, व सदर सभेत राजेंद्र वानखडे,पोलीस पाटील भूषण चौधरी,प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवअधिकार संघटन एव महिला अपराध नियंत्रण शाखा चे जिल्हा अध्यक्ष श्री.मोहन मेढे,तसेच मानवाधिकार संघटनाचे समाधान पाटील सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या वेळी अंतुर्ली चे पोलिस पाटील किशोर मेढे,प्रफुल पाटील,अनिल वाघ नांदवेल, दिलीप पाटील मानेगाव, विजय पाटील कुऱ्हा, संदीप इंगळे सुकळी, अर्चना सावळे चिखली, महेश पाटील मेहुण, सचिन पाटील चिंचोल,गोपनीय विभागाचे रवी धनगर आदी सदस्य उपस्थित होते.सदर बैठकीत सूत्रसंचालन मोहन मेढे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक आशिष अडसुड साहेब यांनी केले.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*