घरात विक्रीसाठी ठेवलेला १६ किलो १९० ग्रॅम गांजा किंमत सुमारे ३ लाख २३ हजार ८०० रुपये गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी कॉटन मार्केट परिसरात बोराखेडी पोलिसांनी केली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र कपले हे २६ ऑगस्ट रोजी गस्त घालत असताना, प्रभाग क्र. ५ मधील कॉटन मार्केट परिसरात राहणारा रोहिदास पांडुरंग मोहिते याने विक्रीसाठी गांजा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार दुपारी दीडच्या सुमारास ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. बालाजी शेंगेपल्लू, पोहेकों अमोल खराडे, महिला पोहेकॉ. अनिता मोरे यांच्या उपस्थितीत पंचांसमक्ष मोहिते यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत घरातून ओलसर हिरवट रंगाचा अंदाजे १६ किलो १९० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याची किंमत सुमारे ३ लाख २३ हजार ८०० रुपये आहे. पोलिसांनी मुद्देमालासह रोहिदास मोहिते यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पीएसआय राजेंद्र कपले यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.
मोताळ्यात घरातून ३ लाख २३ हजाराचा गांजा जप्त बोराखेडी पोलिसांची मोठी कारवाई एक जण ताब्यात
By -
August 28, 2025
0
Tags: