अतिक खान |viral news live
मुक्ताईनगर प्रतिनिधी.... मुक्ताईनगर येथील जुने गाव ठाण्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड चे गाळणी कक्ष ( फिल्टर ) मुक्ताईनगर विभाग चे कार्यालय मुक्ताईनगर पासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सारोळा येथील सब स्टेशन मध्ये हलविण्यात आल्यामुळे मुक्ताईनगर तालुक्या सह वरणगाव बोदवड परिसरातील शेतकरी व ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड चे गाळणी कक्ष ( फिल्टर ) मुक्ताईनगर विभाग सहाय्यक अभियंता यांचे कार्यालय जुने गावातील सब स्टेशन 33/11 केव्ही येथे होते. या कार्यालयातून मुक्ताईनगर सह वरणगाव बोदवड परिसरातून शेतकरी व ग्राहकांना ट्रान्सफॉर्मर, तार, मीटर टेस्टिंग ,ऑइल व इतर साहित्यासाठी जावे लागते. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून सदरचे कार्यालय हे मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील सारोळा येथील 33/11 केव्ही सबस्टेशन येथे हलविण्यात आलेले आहे. यामुळे शेतकरी तसेच ग्राहकांना सात किलोमीटर असलेल्या सहाय्यक अभियंता कार्यालयामध्ये कामानिमित्त जावे लागत आहे.
जुने गावातील सब स्टेशन परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने येथील सहाय्यक अभियंता यांचे गाळणी कक्ष ( फिल्टर ) कार्यालय सारोळा सबस्टेशन येथे हलविण्यात आलेले असल्याचे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी सांगितले. सदरील कार्यालय साठी मुक्ताईनगर शहरात वीज वितरण कंपनीला जागा मिळाली नाही का ? सात किलोमीटर अंतरावर कार्यालय हलविले यामागील हेतू काय असे प्रश्न उपस्थित होत आहे.