बुलडाणा ; मोहम्मद साहब पैगंबर यांची १५०० वी जयंती ५ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शहरात ज्या रस्त्याने मिरवणूक जाते ते रस्ते खराब अवस्थेत आहे. त्यामुळे ईद मिलादूननबी पूर्वी खराब रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशी मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी आज २६ ऑगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाकडे केली आहे.
यावर्षी हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांची १५०० वी जयंती साजरी
करण्यात येणार आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी सकाळी जयंतीनिमित्त इक्बाल चौकातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. परंतु मिरवणुक मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच
ख्वाजा मियाँ चौकातील पूल तुटला आहे, त्यामुळे मिरवणूक पुढे कशी जाईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच, टिपू सुलतान चौक ते मिर्झा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. झाकीरभाई सायकलवाले यांच्या घरापासून मीना मस्जिद रोड दुकानासमोरील संपूर्ण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे मिरवणुक मार्गाची दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी अल मदीना फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.