![]() |
बेटावद : अल्पसंख्यक आयोगाचे सदस्यांचा दौरा |
अतिक खान जळगांव | Viral News Live
(२५ ऑगस्ट २०२५)
अल्पसंख्यक आयोग, महाराष्ट्राचे दोन सक्रिय सदस्य डॉ. अहमद शरीफ आणि जनाब वसीम शेख यांनी आज बेटावद येथे भेट दिली. या भेटीची आधीच माहिती मिळाल्यानंतर काही कारणास्तव प्रत्यक्ष भेट घेता आली नाही, मात्र शाहिद सुलेमान पठाण यांच्या अंत्यसंस्कारापासून आजपर्यंतची पोलिस कारवाई व त्यातील त्रुटी याबाबत आयोगाच्या सदस्यांना फोनवरून सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विविध संघटनांच्या मागण्यांचीही माहिती आयोगाला देण्यात आली.
या संदर्भात अब्दुल अज़ीज सालार, शाहिद मेंबर, फारूक कादरी आणि रईस कुरेशी यांनी आयोगाच्या सदस्यांना भेटण्यासाठी बेटावद गाठले. जामनेरहून जावेद मुल्लाजी व इतर संघटनांचे जबाबदारही उपस्थित होते.
दोन्ही सदस्यांनी पीडितांना धीर देत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे स्थानिक नागरिक व संघटनांनी समाधान व्यक्त केले.