मुक्ताईनगर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

Viral news live
By -
0
मुक्ताईनगर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम
मुक्ताईनगर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

(अतिक खान) मुक्ताईनगर

 मुक्ताईनगर-शहरातील  संत गजानन महाराज संस्थान व ज्येष्ठ नागरिक संघ मुक्ताईनगर  यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी  भुसावळ रोड वरील संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक व दुपारी मंदिराचे सेवक दिपक पाटील यांनी  फकीरा बोरे यांच्या हस्ते सपत्नीक आरती केली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच संध्याकाळी रामरोटी आश्रम ते संत गजानन महाराज मंदिर पर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक आर व्ही राजपूत, अध्यक्ष आर टी जोगी ,संगीता बोरे,सुशीला निळे, राजकन्या जोगी, मिनाबाई पाचपांडे यांचे सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
 राम रोटी आश्रमाचे अध्यक्ष गावंडे यांच्या आश्रमामार्फत सर्व भाविकांना लाडू वाटप करण्यात आले.
   संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी भाद्रपद शुद्ध पंचमीला, म्हणजेच ऋषीपंचमीला साजरी केली जाते, आणि ती यावर्षी गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. महाराज यांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवन समाधी घेतली, त्यामुळे या दिवशी भक्तगण 'श्री गजानन विजय' ग्रंथाचे पारायण करतात, शेगावात पालखी सोहळा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि महाराजांचे आवडते पदार्थ जसे की चून, भाकरी, अंबाडीची भाजी, कांदा, मिरच्या यांचा नैवेद्य भक्तीभावाने अर्पण करतात.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ते प्रकट झाले आणि ते आधुनिक काळातील थोर संत मानले जातात. 
ते दत्तसंप्रदायाचे गुरू होते आणि त्यांना भगवान गणेशाचा अवतार मानले जाते. त्यांनी भक्ती मार्गाने लोकांपर्यंत देवाचे ज्ञान पोहोचवले.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*