मुक्ताईनगरातील भाविक जम्मूत अडकले : वैष्णोदेवी दर्शनासाठी गेलेले भाविक सुखरूप स्थितीत

Viral news live
By -
0
आ. चंद्रकांत पाटील यांनी केली विचारपूस लवकरच भावीक परतीच्या प्रवासाला निघणार


मुक्ताईनगर अतिक खान :- 

आ. चंद्रकांत पाटील यांनी केली विचारपूस लवकरच भावीक परतीच्या प्रवासाला निघणार

 जम्मू-काश्मिरमध्ये सध्या अतिवृष्टीचा हाहाकार सुरू असून यात मुक्ताईनगर तालुक्यातील भाविक हे वैष्णोदेवी यात्रेला गेले असता कटरा येथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मोबाईलवरून या यात्रेकरूंशी संवाद साधला. यात त्यांनी यात्रेकरूंची सद्यस्थिती जाणून घेत त्यांना हवी असणारी सर्व मदत करणार असल्याचे सांगितले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा भागातील सुमारे 42 महिला-पुरुष भाविक हे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी दिनांक 22 ऑगस्ट रोजी रेल्वेने गेलेले होते हे भाविक कटरा येथे अतिवृष्टीमुळे अडकून पडले.  हे सर्व भाविक सुखरूप असून यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी तेथील हॉटेल मालकाच्या मोबाईल क्रमांकावर वर फोन करून संपर्क करून सर्व भाविकांची माहिती घेतली. यावेळी तुकाराम राठोड यांनी आमदार पाटील यांच्याशी बोलत असताना सांगितले की, सर्व भाविक हे सुखरूप असून दोन महिला अडकलेले आहेत त्या महिला देखील मंदिर परिसरात असून सुरक्षित आहे. तेथील प्रशासन त्यांना मदत करत असून लवकरच परतीच्या प्रवासाला निघणार असल्याचे सांगितले. अडकून पडलेले भाविक हे मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा भागातील उमरा, पारंबी, तालखेडा, मोरझिरा येथील आहे सध्या स्थितीत हे सर्व भाविक कटरा येथे सुखरूप आहेत.

आमदार पाटील  रात्रीपासून अडकलेल्या भाविकांची घेत आहे माहिती....

आमदार चंद्रकांत पाटील यांना काल रात्री माहिती मिळाल्यापासूनच त्यांनी मतदारसंघातील नातेवाईकांकडून व तालुका प्रमुख नवनीत पाटील यांच्याकडून माहिती घेत प्रशासनाला देखील सूचना केलेल्या आहेत. तसेच फोनवर झालेल्या संभाषण वेळी काही अडचण असल्यास तात्काळ कळवावे कुठली मदतीसाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अडकून पडलेल्या भाविकांशी भ्रमणध्वनीद्वारे  संपर्क साधला तसेच त्यांना आवश्यक ते मदत पुरवणार असल्याचेही सांगितले. भाविक सध्या स्थितीत सुखरूप असून लवकरच ते परतीच्या प्रवासाला निघणार आहेत असे त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना  कळविले.
Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*