![]() |
✍| अतिक खान, मुक्ताईनगर
रावेर लोकसभा मतदारसंघातील वढोदा (फैजपूर) येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तुलसी हेल्थ केअर सेंटर मार्फत प. पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम व नवीन वैद्यकीय विभागाचा लोकार्पण समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित होत्या. त्यांनी महाराजांचे आशिर्वाद घेत नूतन विभागाचे उद्घाटन केले.
तुलसी हेल्थ केअर सेंटर हे नैसर्गिक चिकित्सा, योग व आध्यात्मिक चिकित्सा यावर आधारित एक अद्वितीय आरोग्यधाम असून, देशभरातील रुग्ण येथे उपचार घेत जीवनशैलीजन्य आजारांवर मात करत आहेत.
नव्या वैद्यकीय विभागात उपलब्ध सुविधा :
- १२० खाटांची स्वतंत्र स्त्री-पुरुष उपचार व्यवस्था
- स्टीम बाथ युनिट, वमन, मृत्तिका चिकित्सा, सूर्यवाष्प स्नान
- अक्युप्रेशर गार्डन, शिरोधारा, जलनेती, योग चिकित्सा
- पंचतत्त्व विभाग, निवास व आधुनिक आहार व्यवस्था
- योग ध्यान सभागृह व हायड्रोथेरपी मसाज इ.
ही संपूर्ण व्यवस्था प. पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्यतज्ज्ञ आचार्य सचिनजी पाटील यांच्या नेतृत्वात चालवली जात आहे.
समारंभाला जगदुरु सत्यंथाचार्य श्री ज्ञानेश्वराचार्यजी महाराज, संत गोपाल चैतन्यजी महाराज, योगी दत्तनाथजी महाराज, ह.भ.प. रवींद्रजी हरणे महाराज यांच्यासह अनेक संत-विद्वान उपस्थित होते. तसेच ना. श्री. संजयजी सावकारे, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, खंडवा खासदार ज्ञानेश्वरजी पाटील, माजी मंत्री आमदार अर्चनादीदी चिटणीस, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोरअप्पा पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नेपानगर आमदार मंजू दादू आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.

