पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मैदानांवर व उद्यानांत यांत्रिक खेळसाहित्य उभारण्यास बंदी

Viral news live
By -
0

 पुणे | २३ ऑगस्ट  | Viral News Live

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) हद्दीतील मैदाने, उद्याने, मोकळी व आरक्षित जागा याठिकाणी अवजड यांत्रिक खेळसाहित्य तसेच विविध प्रकारच्या मनोरंजन साधनांची उभारणी करण्यास महापालिका प्रशासनाने बंदी घातली आहे.

महापालिका क्षेत्रात विविध संस्था व नागरिक उत्सव, प्रदर्शने आणि कार्यक्रमांसाठी महापालिकेची मैदाने, उद्याने व मोकळ्या जागा भाडेतत्त्वावर घेतात. या ठिकाणी प्रेक्षक व विशेषतः लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी झुले, गोलचक्रे, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे तसेच विविध प्रकारच्या राईड्स उभारल्या जातात. परंतु या साधनांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अनेक वेळा साधनं तुटून अपघात झाल्याची उदाहरणे नोंदली गेली आहेत. अशा अपघातांत जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत संबंधित जागा भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, कार्यक्रमाबरोबरच लावण्यात येणाऱ्या यांत्रिक खेळसाधनांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. यामुळे महापालिकेने पुढाकार घेत कठोर निर्णय घेतला असून, मैदानं, उद्याने व आरक्षित जागांमध्ये अशा साधनांना परवानगी न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !