मुक्ताईनगर : अतिक खान)
गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्याच्या मुक्ताईनगर तालुका शाखेची कार्यकारिणी बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीचे मार्गदर्शन संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांनी केले, तर अध्यक्षस्थानी संस्थापक सदस्य दिपक चौधरी होते.
बैठकीत तालुका पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. त्यानुसार,
तालुका अध्यक्ष म्हणून नांदवेल गावचे पोलीस पाटील अनिल वाघ यांची निवड झाली.
तालुका उपाध्यक्ष पदासाठी नरवेल गावचे पोलीस पाटील मुकेश महाजन यांची निवड झाली.
तालुका सचिव म्हणून सुकळी गावचे पोलीस पाटील संदीप इंगळे यांची तर
कार्यकारी अध्यक्ष पदासाठी माळेगाव गावचे पोलीस पाटील सर्वेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीमुळे संघटनेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, तसेच तालुका स्तरावर पोलीस पाटीलांच्या विविध प्रश्नांसाठी सक्षम नेतृत्व उपलब्ध होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.