नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
नांदेड : नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या गाडीमुळे नांदेड आणि मराठवाडा राजधानी मुंबईच्या अधिक जवळ येणार असून, “मराठवाड्याच्या समृद्धीचं नवं दार उघडलं आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये ऐतिहासिक बदल घडत आहेत. प्रगत देशांसारख्या सर्व सुविधा असलेली, भारतातच निर्मित वंदे भारत एक्सप्रेस ही त्या परिवर्तनाचं प्रतीक आहे.
या गाडीचा लाभ मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांना होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. तर, नांदेड–मुंबई विशेष रेल्वे सुरू करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं खासदार अजित गोपछडे यांनी सांगितलं.
मुंबई–नांदेड हे ६१० किमी अंतर आता ९ ते साडेनऊ तासांत पूर्ण होणार आहे. गाडीची आसन क्षमता ५०० वरून १४४० इतकी करण्यात आली असून डब्यांची संख्या ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आली आहे.