सैलानी ; जुन्या वादातून सैलानी येथे मध्यरात्री खूनाची घटना घडली. इंदिरानगर येथील रहिवासी वाटचालक शेख नफीस शेख हफीज वय ३८ याचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला ही घटना शनिवारी सकाळी १२:४५ वाजता सैलानी येथील बरीवाले बाबा दर्ग्याजवळील झोपडीसमोर घडली.
फिर्यादी शेख हाशिम शेख हफीज व ३१ वर्ष राहणारे इंदिरानगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयत शेख नफीस हा अधून मधून सैलानी येथे झोपडीत राहून अवैध धंदे करीत असे.काही दिवसापूर्वी त्याचा आरोपी अलेक्स इनॉक् जोसेफ उर्फ रोनी, शेख सलमान शेख अशफाक,सय्यद वाजीद सय्यद राजू उर्फ वाजिद टोपी यांच्यासोबत वाद झाला होता.याच रागातून शनिवारी सकाळी आरोपींनी झोपडीसमोर बसलेल्या नफिसवर हल्ला केला.हल्ल्यात शेख सलमान ने नफीस उर्फ बाब्या याचे केस पकडून धरले वाजिदने लाकडी दांड्याने त्याच्या पायावर वार केला तर ॲलेक्स उर्फ रोनी ने हातातील धारदार चाकूने सलग तीन ते चार वार छातीवर करून नफिस चा खून केला रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या नफिस चा जागीच मृत्यू झाला हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळतात रायपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्रमांक. १४६/२०२५ भा. द. सं. कलम १०३(१),३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. पुढील तपास सपोनी निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.