बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 7 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त; सन्मान समारंभात गौरव
बुलडाणा, दि. 31 जुलै 2025 : बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील एकूण 7 पोलीस अधिकारी व अंमलदार दिनांक 31 जुलै 2025 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलडाणा येथे दि. 31 जुलै 2025 रोजी दुपारी 2 वाजता सेवानिवृत्ती सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण शाखेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास मा. भा.पो.से. श्री. निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, बुलडाणा तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मोमेंटो, झाडांचे रोपटे, भेटवस्तू व साडी देऊन गौरव करण्यात आला.
सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची व अंमलदारांची यादी खालीलप्रमाणे:
क्र. | पदनाम / नाव | ब.न. | नेमणुकीचे ठिकाण |
---|---|---|---|
1 | श्रेणी पोउपनि / अनिल त्र्यंबक मिरगे | 47 | पो.स्टे. खामगाव ग्रा. |
2 | श्रेणी पोउपनि / चंद्रप्रकाश सुखदेव इंगळे | 443 | पो.स्टे. नांदुरा |
3 | सफौ / शंकरगीर ओंकारगीर गीरी | 393 | पोलीस मुख्यालय, बुलडाणा |
4 | सफौ / सतीष रामकृष्ण चोपडे | 1381 | शिवाजी नगर |
5 | मसफौ / अलका सरदारसिंग नाडे | 1580 | शिवाजी नगर |
6 | सफी / HWO प्रकाश काशीनाथ पोपळघट | - | पो. बिनतारी संदेश विभाग, बुलडाणा |
7 | पोहेकों / प्रविण मधुकर पिंगळे | 1467 | पोलीस मुख्यालय, बुलडाणा |
कार्यक्रमास पो.नि. अशोक काकविपुरे, प्रभारी पो.उप.अधीक्षक (मुख्यालय), पो.नि. सुनील अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा), कार्यालय अधीक्षक श्री सांगळे साहेब, पो.उप.नि. विजय हुडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती श्रीवास्तव, पोलीस पोहेकॉ. श्रीमती ज्योती राठोड, पोहेकॉ. सतीश सोनुने व इतर मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहेकों निलेश रत्नपारखी यांनी केले. सुमारे 70 हून अधिक कुटुंबीय व नातेवाईक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.