कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी माजी आमदार राहुल बोंद्रे आक्रमक सात दिवसात कीट देणार असल्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी केले आश्वस्त

Viral news live
By -
0
कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी माजी आमदार राहुल बोंद्रे आक्रमक सात दिवसात कीट देणार असल्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी केले आश्वस्त
कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी माजी आमदार राहुल बोंद्रे आक्रमक सात दिवसात कीट देणार असल्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी केले आश्वस्त

बुलढाणा जिला उप संपादक। Viral news live

चिखली ..
शासनाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना कीट दिल्या जाते. यासाठी दिलेल्या तारखेला कामगारांना हजर राहून पेटी व इतर साहित्य मिळते. कामगार हजर न राहिल्यास त्यांचा अर्ज बाद केल्या जातो. चिखली तालुका व शहरातील जवळपास ३०० कामगार दिलेल्या तारखेला उपस्थित असतांनाही सर्वर डाऊन व इतर तांत्रिक अडचणीमुळे त्यांना कामगार कीटपासून वंचित राहण्याची पाळी आली होती.  कामगारांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता राहुल बोंद्रे तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले. त्यानंतर कामगारांच्या हकाच्या कीटसाठी राहुल बोंद्रे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी तात्काळ संबंधित विभागाचे मुख्य सचिव तसेच कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याशी संपर्क साधला. भ्रमणध्वनीवर कामगारमंत्र्यांनी तांत्रिक अडचणी दूर करुन सात दिवसात कीट देणार असल्याचे आश्वस्त केले अन् कामगारांच्या चेहन्यावर हास्य फुल्याचे पाहायला मिळाले. गोरगरीब व वंचितांच्या हक्कासाठी सातत्याने लड़ा देत असलेल्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे सोमवार २५

ऑगस्ट रोजीचे कामगारांच्या हकासाठी कीटसाठी केलेले आंदोलन चांगलेच लक्षवेधी ठरले. चिखली व तालुका व शहरातील ३०० कामगार आपले नियोजित काम सोडून पेटी व इतर साहित्य घेण्यासाठी चिखलीला आले होते. मात्र संबधित ठेकेदार तांत्रिक अडचणीमुळे कीटचे वितरण करु शकत नव्हता, तसेच कामगारांना सोमचारीच कीट मिळाली नाहीतर त्यांचे अर्ज बाद होणार होते. आणि ठेकेदाराने कामगारांना कीट दिली नाहीतर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे शासनाचे आदेश आहेत. यापरिस्थितीत राहुल बोंद्रे यांनी संबंधित विभागाचे मुख्य सचिव, कामगार मंत्री

आकाश फुंडकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दिलगिरी व्यक्त करत लवकरात लवकर तांत्रिक अडचणी दूर करून सात दिवसाच्या आत संबंधित कामगारांना कीट उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वस्त केले .

याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष राहुल सवडतकर, तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव,  रिकी काकडे,  अंबादास वाघमारे, सतीश शिंदे,  ईश्वरराव इंगळे व इतर सहकारी उपस्थित होते. यांच्यासह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन् कामगारांनी मानले राहलभाऊंचे आभार

तालुक्यातील अनेक कामगार आपला कामधंदा सोडून कीट घेण्यासाठी चिखलीला आले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे कामगार कीटपासून वंचित राहण्याची पाळी कामगारांबर येणार होती. कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी राहुलभाऊने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने कामगारमंत्री यांनी आकाश फुंडकर यांनी सात दिवसाच्या आत नोंदणीकृत कामगारांना पुन्हा बोलावून कीट वितरित करणार असत्याचे भ्रमणध्वनीवर सांगितल्याने त्यांनी राहुलभाऊंच्या आआंदोलनामुळेच हे शक्य झाल्याच्या भावना व्यक्त करत माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे आभार मानले...

कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे आक्रमक सात दिवसात कीट देणार असल्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी केले आश्वस्त
Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !