मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारीसोबत गैरवर्तन करणाऱ्या तरुणावर कारवाईची मागणी

Viral news live
By -
0
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात महिला कर्मचारीसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी संबंधित तरुणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने तहसीलदारांकडे निवेदन दिले.
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात महिला कर्मचारीसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी संबंधित तरुणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने तहसीलदारांकडे निवेदन दिले.

अतीक खान | Viral news live

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात महिला कर्मचारीसोबत गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात संबंधित तरुणाची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील निवेदन तहसीलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले.
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात महिला कर्मचारीसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी संबंधित तरुणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने तहसीलदारांकडे निवेदन दिले.
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात महिला कर्मचारीसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी संबंधित तरुणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने तहसीलदारांकडे निवेदन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ ऑगस्ट रोजी रात्री उपजिल्हा रुग्णालयात एका महिला कर्मचारी व डॉक्टर यांच्यासोबत एका तरुणाने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला. या तरुणाने अंगावर हात फिरवून अयोग्य वर्तन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून, त्यामुळे प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. संबंधित तरुण हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समजते.

घटनेचा संपूर्ण प्रकार उपजिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित आरोपीवर गुन्हा नोंदवून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांकडे केली.

या निवेदनप्रसंगी तालुका अध्यक्ष यू. डी. पाटील, राजेंद्र माळी, अतुल पाटील, अमिन खान, बापू ससाणे, प्रवीण पाटील, नंदू हिरोळे, दशरथ कांडेलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !