![]() |
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या भेटीने भोरसा-भोरसी ग्रामस्थांमध्ये उत्साह, राजकीय समीकरणांना वेध ! |
बुलढाणा जिला उप संपादक। Viral news live
अतिवृष्टीमुळे शेतजमिनींचे झालेले नुकसान
पाहण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी भोरसा भोरसी परिसरास भेट दिली. दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी पिकांचे नुकसान, सिंचन सुविधा, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच ग्रामीण विकासाबाबत मागण्या सविस्तर मांडल्या. मंत्री जाधव यांनीही ग्रामस्थांच्या व्यथा मनापासून ऐकून घेतल्या व तातडीने मदतकार्य करण्याचे आश्वासन दिले. या पाहणीत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के, भाजपा तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शिवसेना नेते अनमोल ढोरे पाटील, रमेश आकाळ, सतीश भुसारी, प्रदीप भुसारी, समाधान आकाळ, संदीप ढोरे, अशोक ढोरे, रामेश्वर भुसारी, एन. टी. भुसारी, भारत गवई, गजानन मुरकुटे,
संजय भुसारी यांच्यासह बहुसंख्य शिवसेना व सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकेकाळी शिवसेनेचा गड मानला जाणारा भोरसा-भोरसी गाव, मागील विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाच्या उमेदवाराला प्रचंड पिछाडीवर टाकणारा ठरला होता. त्यामुळे जाधव साहेबांच्या या दौऱ्याने पुन्हा एकदा गावात शिवसेनेचे बळ प्रकट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, अनमोल ढोरे पाटील हे प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते असल्याने या गावाकडे जाधव यांचे विशेष लक्ष राहणार, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. स्थानिक कार्यकर्त्यांचा हा मजबूत पाठींबा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे, ग्रामीण विकासाला गती देणे आणि पक्षसंघटन अधिक बळकट करणे या दृष्टीने दौरा केवळ शेतकरी व ग्रामस्थांसाठी आशेचा किरण नाही, तर राजकीय समीकरणांना नवा वेध देणारा ठरला आहे.