भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीची ताकद असली तरी तिचा योग्य वापर व्हायला हवा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला |
नवी दिल्ली : “भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची खरी ताकद आहे, मात्र तिचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे,” असं प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. ते आज दिल्ली विधानसभेत आयोजित पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते.
बिर्ला म्हणाले की, संसदेची आणि विधानसभांची प्रतिष्ठा खालावत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. राजकीय पक्षांनी त्यांच्या सदस्यांच्या सभागृहातील वर्तनाबाबत गांभीर्याने विचार करावा.
पीठासीन अधिकाऱ्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं की, “सभागृहांना जनतेप्रति अधिक जबाबदार आणि पारदर्शक बनवणं ही काळाची गरज आहे.”