नवी मुंबई : आगामी गणेशोत्सव, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांचा कार्यक्रम आणि नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.
सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा व अधिसूचना याबाबत हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी विभाग कार्यालयांमध्ये विशेष कक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
त्याचबरोबर आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कामांची कार्यप्रणाली तयार करून प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.