आपले सरकार" पोर्टलवरच्या सर्व सेवा व्हॉट्सअँप च्या माध्यमातून पुरवाव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस |
राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी असलेल्या आपले सरकार पोर्टलवरच्या सर्व सेवा व्हॉट्सअँप च्या माध्यमातून पुरवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. सेवा सुलभीकरणासाठी त्यांनी आज या सेवांचा आढावा घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सर्व सेवा योग्य प्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्या दृष्टीनं सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रिंगमध्ये सुरवातीस त्या तालुक्यातील १० ते १२ गावांचं समावेश असावा व गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट व व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच सेवा पुरवण्यासाठी डिश डिजिटल सेवा हबचा वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.