नवनियुक्त मतदान नोंदणी कर्मचारी (बी.एल.ओ)यांच्यावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे दबाव तंत्र मतदार नोंदणी अधिकारी तथा व उपविभागीय अधिकारी लक्ष देतील काय? जनतेमध्ये चर्चा

Viral news live
By -
0

 

नवनियुक्त मतदान नोंदणी कर्मचारी (बी.एल.ओ)यांच्यावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे दबाव तंत्र मतदार नोंदणी अधिकारी तथा व उपविभागीय अधिकारी लक्ष देतील काय? जनतेमध्ये चर्चा

जिला प्रतिनिधि। Viral News Live

 मलकापूर :- येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका लागणार असल्याचे चित्र दिसतात राजकीय पक्षांचे पदाधिकारी झाले सक्रिय नवनियुक्त मतदान नोंदणी कर्मचारी यांच्यावर दबाव आणल्या जात असल्याचे जनतेमध्ये चर्चा 

           याबाबत अधिक माहिती अशी की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका होणार असल्यामुळे सर्वच पक्षाचे पदाधिकारी लागले कामाला त्याच अनुषंगाने नवनियुक्त मतदान नोंदणी कर्मचारी हे ग्रामीण भागातील शिक्षक व शिक्षिका असून त्यांना मलकापूर शहरातील पूर्णपणे कल्पना नसून काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त झाल्याची माहिती प्राप्त झाल्या नुसार त्यांनी नवनियुक्त मतदान नोंदणी कर्मचारी (बी.एल.ओ.) यांच्यावर दबाव तंत्र वापरत असून कोणत्याही वेळी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधने व त्यांना सांगणे की तुम्ही काम करत नाही तुम्ही किती काम केले हे आम्हाला सांगा आम्हाला सांगितले नाही तर आम्ही तुमची तक्रार करू अशा प्रकारचे दडपण आणण्याचे कार्य काही पक्षांचे पदधिकारी करत आहे त्यासाठी मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर हे लक्ष देतील काय? व या नवनियुक्त मतदान नोंदणी कर्मचारी यांना शहरातील माहिती नसून ते माहिती घेत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे परंतु राजकीय पदाधिकारी आपल्या पदाचा फायदा घेऊन नवनियुक्त मतदान कर्मचाऱ्यांन वर दबाव आणत असल्याचे नवनियुक्त मतदान नोंदणी कर्मचारी यांच्यामध्ये दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. 

         सदर नवनियुक्त मतदान नोंदणी कर्मचारी हे ग्रामीण भागातील शिक्षक व शिक्षिका असून त्यांना शहरातील मतदान नोंदणी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले परंतु त्या ऐवजी आशा वर्कर   यांना नियुक्त केले असते तर  मतदारांची योग्य आकडेवारी उपलब्ध होऊ शकते त्यासाठी या ग्रामीण भागातील शिक्षक व शिक्षिका यांना वगळून हे कार्य आशा वर्कर यांना दिले तर त्यांची मदत शासनाला होईल कारण आशा वर्कर हे दर दिवशी आपल्या भागातील नागरिकांच्या संपर्कात असतात त्यामुळे सदर काम त्यांना देण्यात आले तर मतदान यादी मध्ये घोळ होणार नाही आणि योग्य मतदारांची नोंद मतदार यादी मध्ये होईल यासाठी मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महसूल यांनी याविषयी लक्ष घालावे जेणेकरून नवनियुक्त करण्यात आलेले मतदान नोंदणी कर्मचारी हे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडणार नाही किंवा शांतता भंग होणार नाही यासाठी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*