जळगाव जामोद, 23 जुलै 2025 (बुधवार)
ग्रामपंचायत पळशी, इस्लामपूर, वडगाव गड आणि धानोरा या परिसरात सुरू असलेल्या दारू व वरली मटका या अवैध धंद्यांविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने आज तीव्र आक्रोश व्यक्त केला. तालुकाध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हजर राहून पोलीस ठाणेदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांनाही देण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनात नमूद करण्यात आले की,
“पळशीसह परिसरातील बीडमध्ये अवैध दारू आणि वरली मटका याचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे. या धंद्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. महिलांचे जीवन नरकासमान झाले आहे. या गंभीर प्रश्नावर तात्काळ कारवाई व्हावी.”
याआधी परिसरातील ग्रामस्थांनी तालुकाध्यक्ष रमेश नाईक यांना भेटून समस्येची सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने ग्रामस्थांच्या सोबत मिळून पोलीस ठाण्यात जोरदार आक्रोश केला.
निवेदनादरम्यान तालुकाध्यक्ष रमेश नाईक यांनी सांगितले,
“पोलीस प्रशासनावर जनतेचा विश्वास आहे. तो विश्वास टिकवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ अवैध धंद्यावर लगाम घालावा. या प्रश्नावर त्वरित लक्ष द्यावे.”
या वेळी ज्येष्ठ नेते भिकाजी वानखडे, विजय तायडे (जिल्हा उपाध्यक्ष), स्वप्निल गवई (जिल्हा सदस्य), पार्वताबाई इंगळे (जिल्हा नेत्या), साहेबराव भगत (तालुका सचिव), राजरत्न वाकोडे (युवा तालुकाध्यक्ष), आझम कुरेशी (शहराध्यक्ष), प्रवीण तायडे (युवा शहराध्यक्ष), अताऊल्ला खान (जिल्हा उपाध्यक्ष), जगदीश हातेकर (तालुका अध्यक्ष – भारतीय बौद्ध महासभा), सुनिता हेलोडे (महिला तालुकाध्यक्ष), प्रमोद कोकाटे (तालुका उपाध्यक्ष), दिलीप तायडे (तालुका उपाध्यक्ष), परमेश्वर पारवे (तालुका संघटक), लोकपाल भगत (तालुका संघटक), राजेश तायडे (तालुका उपाध्यक्ष), प्रदीप मोरखडे, देविदास वानखडे, सुदाम गवई, सुरेश वाघोदे (तालुका संघटक), महादेव बोदडे (तालुका सचिव) तसेच मॅडी तायडे, यशोदा धुरंदर, निर्मलाबाई बिराडे, यशोदा खराटे, निर्मलाबाई खंडेराव, चंद्रकला गुरचळ आणि इतर अनेक महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागामुळे पोलीस ठाण्यात वातावरण तणावपूर्ण पण शिस्तबद्ध राहिले. प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे.
(Viral News Live साठी विशेष प्रतिनिधी)