मलकापुर:- तालुक्यातील विटाळी (धानोरा)येथील विद्यार्थी,विद्यार्थिंनी मलकापूर येथील नूतन विद्यालय व लि.भो.चांडक विद्यालयात शिकण्यासाठी ये-जा करतात त्यांची शाळा अकरा वाजता भरत असल्याने व शिरसोडी बस विटाळीत नऊ वाजताच येत असल्याने या विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजेपासूनच तयारीला लागावे लागते व शाळेच्या दोन तास अगोदर घेऊन शाळेत बसावे लागते तर सायंकाळी या विद्यार्थ्यांची शाळा पावणे पाच वाजता सुटत असून बस ही पावणे पाच वाजता बसस्थानकावरुन सुटत असल्याने या विद्यार्थ्यांची सायंकाळची एक तासीका गमावून यावें लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर यांना सांगितल्याने त्यांनी आज विद्यार्थ्यांसह आगार व्यवस्थापक मुकुंद नावकर यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना सकाळची बस विटाळीत दहा वाजेची व सायंकाळी पाच वाजता ची वेळ करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसानसेना शहरप्रमुख सै.वसीम सै.रहीम, किशोर राऊत,स्वरा राऊत,ओम फाटे,वेदिका बोरसे,आर्या राऊत,ओम टाकर्डे,सोहम राऊत,साई फाटे,केशव बोरसे,केशव क्षिरसागर सह आदिंनी केली, पंढरपूर यात्रा दोन - तिन दिवसांत आटोपल्यानंतर सोमवार दि.6 जुलै 25 पासून बसेस उपरोक्त वेळेत सोडण्याचे आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.
विटाळी धानोर्यात शाळेच्या दोन तास अगोदर बस येत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास; बस शाळेच्या वेळेत सोडण्याची शिवसेना (उ.बा.ठा) ची मागणी
By -
July 03, 2025
0
Tags: