पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी १ जुलै रोजी ग्राम वडगाव पाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाअंर्तगत महाराष्ट्र राज्याचे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती तसेच कृषी दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करुन झाली.या कार्यक्रमामध्ये कृषीविद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच हरितक्रांती व श्वेतक्रांतीचे जनक वसंतरावजी फुलसिंग नाईक यांची माहिती दिली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.नंदा डोंगरकर मॅडम व इतर शिक्षकवृंद हिस्सल सर,बोरसे मॅडम,तिडके मॅडम उपस्थित होते.तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.योगेश गवई सर, उपप्राचार्य प्रा. सतीश धर्माळ सर,कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे सर ,विषयतज्ञ प्रा.जिव्हेश साळी सर यांनी विद्यार्थ्यिनींना कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी राऊत, ज्ञानेश्वरी सपकाळ, संजना बंड, शिवानी बोरोकार, कोमल भोपळे, प्राची तिजारे,निकिता ढोले,आरती टापरे यांनी कार्यक्रम उत्साहात पार पाडला.