वडशिंगी, १ जुलै:
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडशिंगी येथे आज "कृषि दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलंग्नीत स्वात्र्यंतवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगांव जामोद, येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यींनींनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात परिसरातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.इंगळे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक शेतकरी श्री.क्रिष्णा कावरे व उपस्थित सर्व शिक्षकवृदं ह्यांची उपस्थिती लाभली . त्यांनी विद्यार्थ्यांना शाश्वत शेती, सेंद्रिय शेती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.इंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कृषि दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शेतीबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. शेतकरी हा देशाचा खरा अन्नदाता आहे.”
सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.योगेश गवई सर व कार्यक्रमाचे अधिकारी प्रा.श्री.प्रितेश वानखडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता विद्यार्थी प्रतिनिधी रोशनी डामरे व तनुश्री खेडकर ,भाग्यश्री गेबड, लक्ष्मी इंगळे ,दामिनी घाटे ,वैष्णवी भोंडे, प्रतीक्षा खराटे , दीपिका चोरे यांनी कार्यक्रम पार पाडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. रोशनी डामरे हीने केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना कु. रोशनी डामरे हिने आपल्या संदेशातून म्हटले की, "आपण अन्नदाता शेतकऱ्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही. विज्ञानाच्या प्रगतीत शेतीचे महत्त्व अधिक वाढले आहे. म्हणूनच युवकांनी शेतीकडे आदराने पाहायला हवे." आणि तसेच कु. लक्ष्मी इंगळे व कु. दिपीका चोरे यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये कृषीप्रेम निर्माण झाले व कार्यक्रमाला एक वेगळीच उर्जा मिळाली."संपूर्ण कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शेतीबाबत अभिमानाची भावना निर्माण झाली."