हरणखेडला थेट बसफेरी द्या – शिवसेना (उबाठा) व ग्रामस्थांचा ठाम इशारा
Malkapur Viral News Live
मलकापूर तालुक्यातील हरणखेड गावाचा रस्ता अलीकडेच सुस्थितीत करण्यात आला असला तरी गेल्या सहा वर्षांपासून या गावाची एस.टी. बसफेरी बंदच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना तब्बल एक किलोमीटर पायी चालत बोदवड तालुक्यातील हरणखेड बसस्थानक गाठावे लागते.
या गंभीर गैरसोयीबाबत हरणखेडच्या ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना कळविले. त्यानंतर आज शिवसेना पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे एस.टी. आगार व्यवस्थापक मुकुंद नाव्हकर यांची भेट घेऊन “मलकापूर ते हरणखेड ही बसफेरी तातडीने सुरू करावी” अशी ठाम मागणी केली.
पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन उभे राहील. यावेळी दिलेल्या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख हरीदास गणबास, उपशहरप्रमुख शकील जमादार, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी, विभाग प्रमुख चांद चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड, शहरप्रमुख मंगेश सातव, तसेच रा. नेवे, अमोल निकम, राजु शेकोकर, ईश्वर तायडे, प्रशांत तायडे, रामराव तळेकर आणि शेख मोसीन यांची उपस्थिती होती.
ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की, “बसफेरी सुरू होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. गरज पडल्यास मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरू.” प्रशासनाच्या प्रतिसादावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.