आज दिनांक २२/०७/२५ मंगळवार रोजी नूतन विद्यालयाच्या वतीने शाळेतील विद्यार्थी पवन मंगेश तळेले याचा शालेय स्तरावर सत्कार करण्यात आला.
पवन हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिकणारा विद्यार्थी असून त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याची आई मजुरी करून संसार चालवते. आपल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या लहान वयातच स्वीकारून पवन आईला हातभार लावतो. शनिवार-रविवारी सायकलवरून गावभर चहा विकून तो शिक्षणाचा खर्च आणि घरखर्च भागवण्याचा प्रयत्न करतो.
त्याच्या या मेहनती, संघर्षशील आणि स्वाभिमानी वृत्तीने इतर विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
त्याच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आज मुख्याध्यापक मा. श्री. अविनाश बोरले सर, वर्गशिक्षिका सौ. अंजली कोलते मॅडम व क्रीडा शिक्षक हरिसिंग डाबेराव सर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसमोर पवनचा सत्कार करण्यात आला.
नूतन विद्यालयाला अशा विद्यार्थ्याचा अभिमान आहे. पवनसारख्या मुलांकडून समाज घडतो आणि इतरांना प्रेरणा मिळते. त्याच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!
— नूतन विद्यालय परिवार