मलकापूर (प्रतिनिधी) | मलकापूर तालुक्यातील ग्राम हिंगणा काझी येथील मुस्लिम कब्रस्तानाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने या ठिकाणी त्वरित सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात तालुका अध्यक्ष अजय भाऊ सावळे यांच्या नेतृत्वात वंचितच्या शिष्टमंडळाने तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर केले.
यावेळी ज्येष्ठ नेते रामभाऊ गवई, भाऊराव उमाळे, राजूभाऊ शेगोकार यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थितीत भीमरावजी नितो ने होते तर युवा नेते भीमराज इंगळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
ग्राम हिंगणा काझी येथील मुस्लिम कब्रस्तान नदीपलीकडे असल्यामुळे मृतदेह नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी कोणताही पूल नसल्याने शव वाहतूक ट्रॅक्टर किंवा बैलगाडीद्वारे केली जाते, त्यासाठी छातीपर्यंत पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. मागील वर्षी ख्वाजा एक्रोमिद्दिन यांच्या पत्नीच्या मृतदेहासंबंधीचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतरही अशी परिस्थिती असणे दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर, स्थानिक मुस्लिम बांधव आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी स्मशानभूमीच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास पुढील पंधरा दिवसांत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना अरविंद सोनवणे, प्रतापराव बिराळे, निलेश वाघ, भो.ना.मोरे, एस.एन. मोरे, सिद्धार्थ कोंगले, ख्वाजा इलीयाज, धनराज इंगळे हे उपस्थित होते. गावकऱ्यांतर्फे शेख आरिफ शेख महबूब, ख्वाजा कमी रुद्दीन, शेख सादिक शेख शरीफ, ख्वाजा तुहीर उद्दीन, विलास भोंबे, शेख समीर, अश्रफ काझी, दुर्गाबाई कल्याणकर, शेख शरीफ शेख मेहबूब आदींचीही उपस्थिती होती.