'उदयपूर फाईल्स' या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. टिपू सुलतान फाउंडेशन मलकापूर यांच्यावतीने आज एक निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, 'उदयपूर फाईल्स' चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये मुस्लिम धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह संवाद आणि दृश्ये दाखविण्यात आली आहेत. यामुळे मुस्लिम धर्मीयांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या असून समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चित्रपटाचे निर्माता अमित जानी आणि दिग्दर्शक भारत एम. श्रीनाथ यांनी हेतुपुरस्सर मुस्लिम धर्माची बदनामी केली आहे, असेही आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता असून, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाची जबाबदारी
धार्मिक भावना दुखावणाऱ्या किंवा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन होऊ न देणे, ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘उदयपूर फाईल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून, संबंधित निर्माते आणि दिग्दर्शकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर:
हाजी रईस खान जमादार, डॉ. सय्यद सलीम कुरेशी, युसुफ खान उस्मान खान, अताउर रहमान जमादार, फिरोज खान, एजाज शाह, जाकीर मेमन, अजगर जमादार, जमील खान जमादार, सादिक शेख, इस्तियाक जमादार, शोएब लाला, शेर खान, जावेद ठेकेदार, कलीम पटेल, शेख कामरान, इमरान लकी, तनवीर खान, शेख फारूक, शेख मुस्ताक, याकूब खान, शब्बीर अहमद, शेख नाझीम, मुजीब खान, मुजाहिद शेख, सलीम एम.एस., शेख नाझीम राजा, शकील पठाण इत्यादी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.