भोटा (ता. मुक्ताईनगर) :
(अतिक खान)
"अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत" छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याच्या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या भव्य सोहळ्याचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री. चंद्रकांतभाऊ पाटील साहेब यांनी भूषवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमचे मित्र मा. श्री. पंकजभाऊ पांडव यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनोदभाऊ तराळ, समाधानभाऊ महाजन, आनंदभाऊ पाटील, छोटूभाऊ भोई, अफसरभाऊ खान, रघुनाथभाऊ पाटील, हितेशभाऊ पाटील, पंकजभाऊ कोळी, प्रवीणभाऊ चौधरी, पंकजभाऊ पांडव आदी मान्यवर उपस्थित होते.
कुऱ्हा-वडोदा परिसरासह मुक्ताईनगर तालुक्यातील असंख्य शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी या ऐतिहासिक व पावन सोहळ्याला उत्स्फूर्त उपस्थिती लावली. उपस्थित शिवभक्तांनी "जय जिजाऊ, जय शिवराय" च्या घोषणांनी वातावरण दणाणून टाकले.
या प्रसंगी सहभागी सर्व मान्यवर, शिवप्रेमी आणि ग्रामस्थांचे भोटा ग्रामस्थ व शिवस्मारक समिती तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

