दुर्गा उत्सव निमित्त अहिरवाडी येथे महिलांचा गौरवपूर्ण सत्कार

Viral news live
By -
0
दुर्गा उत्सव निमित्त अहिरवाडी येथे महिलांचा गौरवपूर्ण सत्कार

दुर्गा उत्सव निमित्त अहिरवाडी येथे महिलांचा गौरवपूर्ण सत्कार

(अतिक खान रावेर)

रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा उत्सव समिती यांच्या वतीने दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाचा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात समिती अध्यक्ष पराग चौधरी व संदीप सावळे यांच्या पुढाकाराने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला एपीआय मीरा देशमुख मॅडम, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वंजारी, तलाठी रवी शिंगणे, तसेच दुर्गा उत्सव महिला लेझीम मंडळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने पोलीस, सैनिक तसेच विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करून समाजात “महिला सक्षमीकरण” हा दृढ संदेश देण्यात आला.

या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून, गावात या माध्यमातून सामाजिक ऐक्य व महिला आदराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)