![]() |
अधिकाऱ्यांशी चर्चा व आश्वासनानंतर संजय कांडेलकर यांचे उपोषण मागे. |
संदीप जोगी मुक्ताईनगर.......२ ऑक्टोंबर पासून मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकामध्ये
आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मुक्ताईनगर येथील संजय कांडेलकर हे आमरण उपोषणात बसलेले होते .
उपोषणादरम्यान माजी मंत्री दशरथ भांडे व मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून वेळोवेळी चर्चा करून उपोषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली .
याची दखल घेऊन बुधवारी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार गिरीश वखारे , नायब तहसीलदार निकेतन वाडे यांनी उपोषणकर्ते संजय कांडेलकर यांच्याशी चर्चा करून मागण्या संदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्याच्या सकारात्मक विषयावर चर्चा केली व जातीचे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना गृह चौकशी करून दाखले देण्यात येतील व त्यांच्याकडे अगोदर सर्टिफिकेट दिलेले आहेत त्या कुटुंबामध्ये त्यांना सुद्धा दाखले देण्यात येतील असे प्रांत अधिकारी यांनी मान्य केले.
यावेळी समाज कार्यकर्ते डॉ दिलीप तायडे , बंटी जैन, भगवान भोलाने ,सुरेश कोळी सर ,सुकलाल सांगळकर, पांडुरंग बावस्कर ,प्रकाश कोळी ,कैलास कोळी, दीपक कांडेलकर ,संजय बावस्कर ,नंदू जाधव, जगन कांडेलकर ,संजय सपकाळे, योगेश कोळी ,जीवन पाटील , जानकीराम सोनवणे, कृष्णा महाराज व समाज बांधव उपोषण सोडवताना हजर होते
उपोषणा दरम्यान जिल्हाभरातील समाज बांधवांनी उपोषणाला हजर राहून पाठिंबा दिला तसेच विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा पाठिंबा ़ दिला या याबद्दल आदिवासी कोळी समाजाच्या वतीने सर्वांचे संजय कांडेलकर यांनी आभार मानले आहे.