![]() |
मुक्ताईनगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा... |
अतिक खान मुक्ताईनगर -- शहरातील मुख्य असलेल्या प्रवर्तन चौकात 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त सकाळी प्रवर्तन चौकातील महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या अर्धाकृती प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले सुरुवातीला सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित बांधवांनी एकमेकांना अशोका विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक प्राध्यापक डॉक्टर संजीव साळवे, बौद्धाचार्य सुनील अढागळे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष शरद बोदडे, विश्वंभर अडकमोल, संतोषदादा बोदडे, सुधाकर बोदडे , रवींद्र बोदडे, बापू ससाणे , नंदू जाधव, शाहीर धुरंधर, प्राध. डॉ. संतोष थोरात, आप्पा भालेराव, आर.वाय. सोनवणे, उमेश झाल्टे, राजेंद्र बाऱ्हे, राजेंद्र वानखेडे, श्री. इंगळे, श्री. शिरसोदे विनोद बोदडे यांच्यासह असंख्य बांधव उपस्थित होते. शेवटी सरण्णत्तयाने कार्यक्रमाची सांगता झाली.