बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापकाची मनमानी; दवाखान्याच्या उपचारार्थ भाच्याने खात्यात पाठविलेले पैसे पिक कर्जात जमा करण्याचे फर्मान

Viral news live
By -
0

दवाखान्याच्या उपचारार्थ पैसे द्या अन्यथा बॅकेसमोर बुधवारी डफडे बजाव चा शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचा इशारा

बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापकाची मनमानी; दवाखान्याच्या उपचारार्थ भाच्याने खात्यात पाठविलेले पैसे पिक कर्जात जमा करण्याचे फर्मान

मलकापुर:-तालुक्यातील वडोदा (पान्हेरा) येथील शेतकऱ्यांच्या भाच्याने वडिलांच्या दम्याच्या उपचारार्थ मामाच्या खात्यात पैसे पाठविले, मात्र मामाने पीक कर्ज काढलेले असल्याने ते पैसे पिककर्ज खात्यात जमा करण्याचे सांगून चार महिन्यापासून पैसे देण्यास बँक मॅनेजर टाळाटाळ करीत असल्याने बार्डर सुरक्षा फोर्स (बि.एस.एफ) जवानाच्या वडीलांचा उपचार रखडला असल्याने याबाबतची माहिती संबंधित शेतकऱ्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख (उबाठा) गजानन ठोसर यांना दिल्याने आज दि.07 ऑक्टोबर 25 रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरीदास गणबास सह आदि पदाधिकाऱ्यांनी बॅकेत जावून मॅनेजर यांना शेतकऱ्याचे बचत खात्यातील पैसे द्या अन्यथा उद्या दि.08 ऑक्टोबर 25 बुधवार रोजी बॅकेसमोर डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला आहे.

      मलकापूर तालुक्यातील वडोदा (पान्हेरा) येथील हरीदास रामदास गायकवाड यांची वडोदा येथे दोन एकर शेती असून त्या शेतीवर सन 22 - 23 मध्ये पन्नास हजार रुपये पीक कर्ज काढले आहे, त्यांच बचत खात्यावर हरीदास गायकवाड यांच्या बीएसएफ मध्ये पश्चिम बंगाल येथे कार्यरत असलेल्या अतुल वसंतराव कडू यांनी त्याच्या वडिलांच्या दम्याच्या उपचारांचा एक लाख 56 हजार रुपये पाठविले होते ते पैसे काढण्यासाठी हरीदास गायकवाड बँकेत केले असता बँक मॅनेजर कौशल वाडेकर यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करून सदरचे पैसे कर्ज खात्यात जमा करण्याचे फर्मान सोडले असून चार-पाच महिन्यापासून पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने वसंतराव कडू यांचा दम्याचा उपचार रखडला आहे. बचत खात्यात असलेले दीड लाख रुपये उपचारार्थ तात्काळ द्या अन्यथा बुधवार रोजी सकाळी 11 वाजता बॅक ऑफ महाराष्ट्र समोर डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)