मुक्ताईनगर येथून घरासमोरूनच मोटरसायकलची चोरी

Viral news live
By -
0
मुक्ताईनगर येथून घरासमोरूनच मोटरसायकलची चोरी
मुक्ताईनगर येथून घरासमोरूनच मोटरसायकलची चोरी

संदीप जोगी  मुक्ताईनगर - शहरातील प्रवर्तन चौका जवळच राहत असलेल्या पत्रकार सचिन अरविंद झनके यांच्या मालकीची मोटरसायकल भर दुपारी घराच्या समोरून चोरून नेल्याची घटना घडली आहे. शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सचिन झनके यांच्या मालकीची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक एम एच 19 सी.एस.7977 ही दारासमोर लावलेली असताना अज्ञात चोरट्याने मोटरसायकलचे लॉक तोडून मोटरसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. मोटरसायकल चोरी जाताना सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही च्या माध्यमातून शोध घेतला असता सदर मोटरसायकल वरणगाव रस्त्याने अज्ञात चोरटा पळून येत असताना पोलिसांना आढळून आले आहे. घराच्या समोरच लावलेले मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी पळून नेल्याने नागरिकांमध्ये व वाहनधारकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)