बुलढाणा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा मोठ्या थाटात संपन्न मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते विजेत्यांना पदकांचे वितरण

Viral news live
By -
0
बुलढाणा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा मोठ्या थाटात संपन्न  मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते विजेत्यांना पदकांचे वितरण

बुलढाणा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा मोठ्या थाटात संपन्न

मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते विजेत्यांना पदकांचे वितरण 

बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी श्री. श्रेणीक लोढा (अपोआ, बुलढाणा) व श्री. अमोल गायकवाड (अपोअ. बुलढाणा) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

दि. 07 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर झालेल्या या स्पर्धेत मलकापूर, देऊळगाव राजा, बुलढाणा, खामगाव, मेहकर या पाच प्रमुख उपविभागांबरोबरच पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथील पथकांनी सहभाग नोंदवला होता. विविध खेळ प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या खेळाडूंना मा. श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्रे व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

बुलढाणा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा मोठ्या थाटात संपन्न  मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते विजेत्यांना पदकांचे वितरण

या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. अशा क्रीडा स्पर्धा पोलीस दलात आरोग्य, टीमस्पिरिट आणि सकारात्मक ऊर्जेची भावना वाढवतात. समाजरक्षणासाठी सक्षम पोलीस दल तयार होण्यासाठी या स्पर्धांचा नक्कीच मोठा फायदा होईल.”

या समारोप कार्यक्रमाला मा. श्री. निलेश तांबे हे सहपरिवार उपस्थित होते. या वेळी श्री. श्रेणीक लोढा (अ. खामगाव), श्री. अमोल गायकवाड (अपोअ. बुलढाणा), श्री. सुधीर पाटील (उपविपोअ. बुलढाणा), श्री. प्रदीप पाटील (उपविपोअ. खामगाव), श्री. आनंद महाजन (उपविपोअ. मलकापूर), श्री. संतोष खाडे (उपविपोअ. मेहकर), श्रीमती मनिषा कदम (उपवि. देऊळगाव राजा), पोनि. श्री. सुनिल अंबुलकर (स्थानीय गुन्हे शाखा, बुलढाणा), पोनि. श्री. काकविपुरे (जि.वी.शा. बुलढाणा), पोनि. श्री. बाळकृष्ण पावरा (प्रभारी पोउपअधी. मुख्यालय, बुलढाणा) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोनि. श्री. सुनिल अंबुलकर, पोनि. श्री. बाळकृष्ण पावरा, RPI श्री. विवेक तिडके, सपोनि. दिपक ढोमणे (वाचक पोअ. बुलढाणा), RSI श्री. जावळे, मुतलीक शेख, सफौ. नसीम मिर्झा, पोहेकॉ. शिवाजी साबळे, रामराव जवंजाळ, अर्चना इंगळे, राहूल वाघ, पो.अं. नरेश रेड्डी, अमोल हिवाळे, अमोल तळमळे, नितीन इंगळे, नासीर शेख, असलम शेख, शेख नदीम, अरविंद विजय सोनोने, अविनाश गीहे, सतीश सोनोने, राहूल बटुकर, विजय पैठणे, पो.मु. बुलढाणा आदींचे मोलाचे परिश्रम राहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहेकॉ. निलेश रत्नपारखी (पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा) यांनी केले.









Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)