![]() |
कोल्हापूर पोलीस दलातील हवालदारच निघाला बनावट नोटांचा मोरक्या! |
(अतिक खान)
१ कोटी ११ लाखांच्या बनावट नोटांसह पाच जणांना अटक**
कोल्हापूर : शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूर पोलीस दलातीलच एक हवालदार बनावट नोटा छापण्याच्या रॅकेटचा प्रमुख असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस दलातील एका हवालदाराने काही साथीदारांच्या मदतीने बनावट चलन छापण्याचा व्यवसाय सुरू केला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर छपाईसाठी लागणारे साहित्य, संगणक उपकरणे आणि बनावट नोटा आढळून आल्या.
या कारवाईनंतर पोलीस विभागातच खळबळ माजली असून, संबंधित हवालदारावर शिस्तभंगात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.