![]() |
राज्य शिक्षक संघाची प्रभावी संवाद सभा मलकापूर येथे पार पडली शिक्षकांच्या समस्या, निवडणुकीतील भूमिका आणि संघटनात्मक एकतेवर भर |
मलकापुर :- राज्य शिक्षक संघ, अमरावती विभाग, अमरावती शिक्षक मतदारसंघ यांच्या वतीने दि. 11 ऑक्टोबर 25 रोजी शनिवार, सायंकाळी सहा वाजता हॉटेल अमोल, बोदवड रोड, मलकापूर येथे प्रभावी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य किरण पाटील सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य दिलीप भीमराव कडू सर अध्यक्ष राज्य शिक्षक संघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन आशुतोष लांडे सर कार्याध्यक्ष राज्य शिक्षक संघ, तसेच ललित चौधरी सर, नंदकिशोर नवरे सर, प्रवीण टेंबरे सर (जिल्हाध्यक्ष), भागवत काळे सर (उपाध्यक्ष), रमेश पालवे सर व ज्ञानदेव हिवाळे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशुतोष लांडे सर यांनी सुसंवादपूर्ण पद्धतीने केले, तर सुत्रसंचालन बी. एन. सुरवाडे सर यांनी प्रभावीपणे केले.
या प्रसंगी मलकापूर व परिसरातील शेकडो शिक्षक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून पि डी होले सर (मुख्याध्यापक, दत्त विद्यालय, धानोरा), जे एच राठोड सर (मुख्याध्यापक, यशवंत हायस्कूल, चांदूर बिस्वा), दिलीप अढाव सर (मुख्याध्यापक, विद्या विकास विद्यालय, वाकोडी), ए. बी. खर्चे सर (मुख्याध्यापक, एडेड हायस्कूल, शेलगाव बाजार), सुरडकर सर (मुख्याध्यापक, जनता विद्यालय, तळणी), जुमळे सर,कोलते सर (पर्यवेक्षक, यशवंत हायस्कूल, चांदूर बिस्वा) आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राचार्य दिलीप कडू सर अध्यक्ष राज्य शिक्षक संघ यांनी आगामी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "आपला उमेदवार कसा असावा" या विषयावर सविस्तर विचार मांडले. शिक्षकांच्या समस्या, त्यांना होणारा प्रशासकीय त्रास, आणि त्या समस्यांवर उपाययोजना करणाऱ्या शिक्षक आमदाराची अपेक्षित भूमिका यावर त्यांनी स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.शिक्षकांच्या विविध समस्या, आव्हाने आणि त्यांच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करत शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटनात्मक एकजूट गरजेची असल्याचे प्रतिपादन केले. भविष्यातील संघर्ष आणि शिक्षकहिताच्या धोरणात्मक योजना त्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजीव पाटील,अरुण पाटील, अरुण अढाव,पालवे, बाबुराव जंगले, आर. एस. पाटील,विजय आनंद पाटील,गणगे,व्यवहारे पोफळी,प्रवीण पाटील आणि देवकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाबुराव जंगले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध आणि विचारप्रधान वातावरणात पार पडला.