पारंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा मैदानी खेळात सहभाग
By -
October 05, 2025
0
नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथील विद्यार्थ्यांनी शिवाजी हायस्कूल कुऱ्हा काकोडा या ठिकाणी नुकतेच आयोजित मैदानी खेळामध्ये सहभाग नोंदवला. त्यामध्ये इयत्ता दहावीतील शौर्य संतोष वानखेडे 1500 मीटरच्या रनिंग मध्ये द्वितीय तर संदेश उमेश बडगे गोळा फेक पियुष किशोर बडगे हा विद्यार्थी गोळा फेक मध्ये प्रथम आलेला आहे. इयत्ता नववीतील अरविंद गोपाल चव्हाण रनिंग मध्ये तसेच इयत्ता नववीची विद्यार्थिनी विद्या विनोद तायडे, समृद्धी विनोद झांबरे इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी गौरी राजेंद्र पाटील, आचल सिद्धार्थ तायडे या विद्यार्थिनींनी अनुक्रमे 100 मीटर ,200 मीटर, 400 व 800 मीटर रनिंग मध्ये सहभाग नोंदवला .याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर व श्री रोहन आठवले यांनी सहकार्य केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष पाचपोळ, श्री संतोष ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे कुऱ्हा विभाग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री वसंतराव पाटील, उपाध्यक्ष श्री दामोदर पाटील, सचिव श्री भास्कर पाटील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केलेले आहे.
Tags: