पारपेठ भागातील गुलाब बाबा दर्गा,मदारटेकडी जुनी ईदगाह रोड नालीचे काम शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने सुरू

Viral news live
By -
0
पारपेठ भागातील गुलाब बाबा दर्गा,मदारटेकडी जुनी ईदगाह रोड नालीचे काम शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने सुरू
पारपेठ भागातील गुलाब बाबा दर्गा,मदारटेकडी जुनी ईदगाह रोड नालीचे काम शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने सुरू 

 मलकापुर:-  शहरातील पारपेठ भागातील गुलाब बाबा दर्गाजवळील नाजीर शाह शफुशाह यांच्या घरासमोरील रस्ता, नाली व मदार टेकडी जुनी ईदगाह रोड वरील ढाप्याची अत्यंत दुरावस्था झाली असून  दोन्ही बाजूंनी आलेल्या नाल्याच्या जोडणी रखडल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत असून या दुर्गंधीमुळे रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, रस्ता व नाली बनविणाऱ्या ठेकेदाराने बिल काढून अर्धवट काम सोडून पोबारा केला असल्याने याबाबत शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांनी त्या अर्धवट कामाची पाहणी करून न.प बांधकाम अभियंता धिरज ठोंबरे यांना दोन दिवसांत या ठिकाणच्या दोन्ही बाजूंच्या नालींची तात्काळ जोडणी करून अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा न.प  कार्यालयातच आमरण उपोषण करण्याचा इशारा भ्रमणध्वनी द्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी धिरज ठोंबरे यांना दिला होता, शिवसेना (उबाठा) च्या न.प कार्यालयातील आमरण उपोषणाच्या इशाऱ्याच्या धास्तीने रविवारी या दोन्ही ठिकाणच्या ढाप्या चे काम सुरू केले आज या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जावून शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै.रहीम, शिवसेना विभागप्रमुख सत्तार शाह, युवा सेना शहरप्रमुख मंगेश सातव, किशोर राऊत,शेख मोहसीन शेख छोटू, साबीर खान आमीर खान,इरफान खान, इस्लाम खान, साबीर खान,मोहम्मद साबीर, शेख अक्रम, शेख असलम, सद्दाम खान, जमीर शेख, साबीर सय्यद, शेख अर्शद, शेख सलमान, शाहरुख खान, शेख अजीम,शेख ओवेस  शेख हमीद, शेख रिजवान शेख रफिक, शेख आसिफ शेख सलीम, अरबाज खान, अजीज  शाह,शेख तन्वीर, शेख नावीद, शेख शफीक, शेख जुबेर,युनुसखाॅ पठाणसह आदिंची उपस्थिती होती.
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)